
स्थैर्य,सातारा, दि. २४: जीएसटी ऑनलाईन व्यवसाय यांच्या नियमांच्या अन्यायकारक अटींमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात शुक्रवार दि २६ रोजी त्यांचे शिखर संघटना काॅन्फेडेरेशन ऑफ ऑल इंडिया (CAIT) यांनी पुकारलेल्या भारत बंदला सातारा जिल्ह्यात पाठिंबा देण्याचा निर्णय सातारा जिल्हा व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे
आज बुधवार दि २४ रोजी सातारा जिल्हा व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग आयोजित केली होती सदरच्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
दि.२६ रोजी च्या भारत बंदला साताऱ्यात जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्यांच्या मिटिंगमध्ये एकमताने पाठिंबा दर्शवून आपले सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे ठरवले आहे. या भारत बंदला सर्व व्यापारी बंधूंनी पाठिंबा देऊन सहकार्य करावे असे आवाहन सर्व व्यापारी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.