फलटण शहरात व्यापाऱ्यावर मद्यपींचा हल्ला; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह


स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑक्टोबर : फलटण शहरातील प्रसिद्ध व्यापारी प्रतिष्ठाण असलेल्या बालाजी स्वीट होमच्या एका व्यापाऱ्याला पाच मद्यपींनी मारहाण करून दगडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बालाजी स्वीट होममधील एक व्यक्ती दुकानासाठी माल घेऊन जात असताना, दारूच्या नशेत असलेल्या पाच जणांनी त्यांना अडवून मारहाण केली. मारहाण झालेली व्यक्ती दुकानात पोहोचल्यानंतर, दुकानातील इतर कर्मचारी आणि मालक जाब विचारण्यासाठी गेले असता, त्या मद्यपींनी त्यांच्यावर मोठ्या दगडांनी हल्ला केला. या दगडफेकीत बालाजी स्वीट होममधील काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी बालाजी स्वीट होमच्या वतीने फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रतिष्ठित व्यापाऱ्यांवर अशाप्रकारे हल्ले होत असल्याने, शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


Back to top button
Don`t copy text!