ट्रेडइंडियाने २.९ दशलक्ष एसएमईंना केले सक्षम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । मुंबई ।  ट्रेडइंडिया या भारताच्या सर्वात मोठ्या ऑनलाइन बी२बी बाजारस्थळाने देशभरातील एसएमई व स्थानिक व्यवसायांसाठी विकासाचे अत्यंत लाभदायी वर्ष दर्शवले आहे. कंपनीने नवीन व्यवसाय संधी व लाभ देत २०२१ मध्ये २.९ दशलक्ष एसएमईंना केले सक्षम आहे. ही उल्लेखनीय यशस्वी व्यवसाय कामगिरी ट्रेडइंडियाची कार्यरत उपस्थिती व बाजारपेठ उपस्थिती वाढवण्यामध्ये देखील साह्यभूत ठरली. कोविड-१९ महामारीमुळे मागील व्यवसाय ट्रेण्ड्समध्ये मोठा बदल झाला आहे. लघु व मध्यम उद्योग परिसंस्थेमधील संपूर्ण उद्योगक्षेत्रामध्ये डिजिटायझेशनला चालना मिळाली आहे.

महामारीमुळे पूर्णत: डिजिटल इनवॉईस आणि पेमेण्ट कलेक्शन्स परिसंस्थेच्या विकासाला चालना मिळत असताना ट्रेडइंडियाने ४५,००० हून अधिक एसएमईंना व्यवसायासाठी डिजिटल लेण्डर सोल्यूशन ट्रेडखात्याचा वापर करत ९६ कोटी रूपयांचे इनवॉईस निर्माण करण्यामध्ये मदत केली आहे. तसेच जवळपास २२,००० हून अधिक लघु व्यवसायांनी त्यांची ऑनलाइन उपस्थिती वाढवण्यासोबत गुगल माय बिझनेसचा वापर करत त्यांची स्थानिक व्यवसाय दृश्यमानता वाढवली. फक्त एवढेच नाही, ट्रेडइंडियावर सूचीबद्ध विविध उद्योगक्षेत्रातील व्यापा-यांची १ लाखाहून अधिक उत्पादने गुगल शॉपिंगवर दिसली, जेथे अधिक दृश्यमानता व विक्री निर्माण करत लघु व्यवसायांना दुप्पट लाभ मिळाले.

ट्रेडइंडियाचे प्रवक्ता म्हणाले, “जगभरातील उद्योगांना महामारीचा मोठा फटका बसला. व्यवसाय स्थितीमधील अचानक बदलामुळे स्पष्टपणे दिसून आले की, डिजिटल नवोन्मेष्काराप्रती संपूर्ण अवलंब अशा संकटामध्ये संरक्षण करू शकतो. म्हणूनच ट्रेडइंडियाने अनेक एसएमईंना त्यांच्या तंत्रज्ञान क्षमता वाढवण्यामध्ये आणि न्यू नॉर्मलमध्ये डिजिटलचा अवलंब करण्यामध्ये सक्षम करण्याप्रती कटिबद्धता कायम ठेवली. आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही आवश्यक तंत्रज्ञान संसाधने व माहिती उपलब्ध करून दिली, जे देशातील एसएमई समुदायासाठी महत्त्वपूर्ण व्यवसाय परिवर्तनासारख्या उत्प्ररेकामध्ये महत्त्वाचे ठरले. देशाचे आधारस्तंभ असलेल्या लघु व मध्यम उद्योगांच्या कार्यसंचालनांसह आम्हाला विश्वास आहे की, नवीन संधी व शुभारंभांच्या हा उदयोन्मुख विकास महामारीनंतरच्या युगामध्ये भारताच्या आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचालीला नवीन दिशा देण्यामध्ये दीर्घकाळापर्यंत लाभदायी ठरेल.”


Back to top button
Don`t copy text!