स्थैर्य , नवी दिल्ली, दि.२६: कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट)ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्विगीसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांवर दिवसाढवळ्या दरोडा टाकत असल्याचा आरोप करून या कंपन्या उत्पादनांची पूर्ण माहिती न देता लीगल मॅट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटी) कायदा-२०११ आणि एफएसएसएआयच्या निर्देशांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे. उत्पादन कोणत्या देशातील आहे, त्याचा निर्माता कोण ही माहिती कंपन्या देत नाहीत, असा आरोप करत कॅटने वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले आहे. यात अशा ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कॅटचे राष्ट्रीय सचिव बी. सी. भारतीय आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी याला पुष्टी दिली. ई-कॉमर्स पोर्टलवर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांवर त्याबाबत सर्व माहिती टाकणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. या वस्तू किती दिवसांपर्यंत वापरण्यायोग्य आहेत हे पण सांगणे आवश्यक आहे.