दैनिक स्थैर्य । 29 नोव्हेंबर 2024 । फलटण । परंपरेनुसार फलटण येथे श्रीराम रथोत्सवास सुरुवात झाली असून येत्या 2 डिसेंबर रोजी या रामयात्रेचा मुख्य दिवस आहे. या पार्श्वभूमीवर फलटण शहरात मोठ्या पाळण्यांसह विविध प्रकारची खेळणी दाखल झाली आहेत.
यंदा शहरातील डी. एड. कॉलेज चौक, यशवंतराव चव्हाण विद्यालय पटांगण व घडसोली मैदानासमोर या तीन ठिकाणी पाळणे व अन्य खेळण्यांची उभारणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून परवाना घेवूनच पाळणा व खेळणी मालकांनी आपले व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी केले आहे.