दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । भारतीय उन्हाळी हंगामाकरिता उत्सुक असताना जागतिक अग्रगण्य ट्रॅव्हल सर्च साइट कायक डॉटकोडॉटइनच्या उत्साहवर्धक नवीन फ्लाइट सर्च डेटामधून निदर्शनास येते की, २०२३ मध्ये भारतातील प्रवासासाठी मागील सहा महिन्यांनी महामारीपूर्वीच्या पातळ्यांना मागे टाकले आहे, जेथे २०१९ मधील याच कालावधीच्या तुलनेत जवळपास २९ टक्क्यांची वाढ झाली. यामधून निदर्शनास येते की कदाचित इनबाऊंड पर्यटकांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करण्याबाबत पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि देशाच्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्याप्रती प्रयत्नांचे परिणाम दिसून येत आहेत.
‘‘भारतीय पर्यटन क्षेत्रासाठी हे अत्यंत सकारात्मक आहे, जे पारंपारिक स्रोत बाजारपेठांमधून इनबाऊंड प्रवास वाढवण्यासोबत जगभरात आपला प्रचार वाढवण्याप्रती प्रयत्न वाढवत आहे,’’ असे कायक येथील इंडिया कंट्री मॅनेजर तरूण तहिलियानी म्हणाले.
युनायटेड स्टेट्स दीर्घकाळापासून भारतातील सर्वात प्रमुख पर्यटन स्त्रोतांपैकी एक आहे, या वर्षाच्या अखेरीपर्यंत फ्लाइट्सच्या शोधात महामारी-पूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत जवळपास २१ टक्के वाढ झाली आहे. इतर युरोपीय देशांमधून फ्लाइट शोधांमध्ये झालेली वाढ देखील खूप सकारात्मक आहे, यूकेमध्ये जवळपास ४८ टक्क्यांनी आणि फ्रान्समध्ये जवळपास २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कॅनडाकडून २०१९ च्या तुलनेत जवळपास ६३ टक्क्यांनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
‘‘आम्ही एक जागतिक ट्रेण्ड पाहत आहोत, जेथे प्रवाशांना नवीन, अद्वितीय व वेगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. आणि म्हणून ते नेहमीच्या पसंतीच्या पलीकडे भारतामध्ये आणखी नवनवीन काय पाहायला मिळू शकते याचा शोध घेत आहेत. ही बाब अनेक स्थानिक पर्यटन कंपन्यांसाठी अत्यंत खूप सकारात्मक आहे, कारण अधिकाधिक पर्यटकांचे लक्ष त्यांच्या ऑफरिंग्जकडे वळाले आहे, ज्यामधून पर्यटन व अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची खात्री मिळते,’’ असे तहिलियानी म्हणाले.
जागतिक पर्यटक भारताच्या विविध अनुभवांमध्ये मग्न होऊ पाहत आहेत. देशाच्या समृद्ध वारसा आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या क्रॉस सेक्शनवर असलेल्या नवी दिल्ली, मुंबई व हैदराबाद या विस्तीर्ण शहरांनी सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गंतव्यस्थानांच्या यादीतील शीर्ष तीन स्थाने मिळवली आहेत. संस्कृती, परंपरा आणि पाककृतींसह अपवादात्मक अनुभव ही भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वात लक्षणीय आकर्षणे आहेत. किचकट कापडाचे घर, मुघल वारसा व अतुलनीय स्वादिष्ट पदार्थ असलेल्या अहमदाबाद सारख्या शहरांना देखील सर्वात जास्त मागणी असलेले स्थान मिळाले आहे आणि आंतरराष्ट्रीय अभ्यागतांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. कोची, तिरुवनंतपुरम आणि नेहमीच आवडते गोवा यांसारखी हिरवीगार निसर्गरम्य समुद्रकिनारे, दक्षिणेकडील गंतव्यस्थाने यांनी देखील प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे.