पर्यटनस्थळे निसर्गसंपदेने नटली, मात्र पर्यटकांविना ओस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०५ : पावसाळी पर्यटनाची पंढरी समजला जाणारा कास ,बामणोली ,ठोसेघर ,परळी परीसर निसर्गाच्या विविधरंगी रुपानी बहरला असुन दाट धुके वाहणारे धबधबे हिरव्यागार डोंगररागांनी सजला असून कोरोना रोगाच्या वाढत्या प्रर्दुभावामुळे पर्यटनस्थळे पर्यटकांविना ओस पडली आहेत.

कास परिसरात गेल्या माहिनाभर वारंवार आवकाळी पावसाची सतत बरसात होत असल्याने हिरव्यागार चाऱ्याने डोंगररांगा बहरुन गेले आहेत. गेल्या चार दिवसापासून मान्सुनच्या पावसाने जिल्हयात दमदार हाजेरी लावली असून ओढे-नाले दुतडी भरून वाहत असून छोठे-मोठे धबधबे जोरदार पाण्याने फेसाळून ओसंडून वाहु लागले आहेत. दाट धुके अन् सोसाट्याचा वारा यामुळे पावसाळी पर्यटनाचा खरा हंगाम तयार झाला असून यावर्षी पर्यटकांना तो कोरोनाच्या वाढत्या प्रर्दुभावामुळे व पर्यटनावर बंदी असल्याने लुटता येणार नसून पर्यटनस्थळे पर्यटकांनाविना ओस पडली असल्याचे पहायला मिळत आहेत.

कास तलाव, कास पठार, बामणोली बोंटीग क्लब, वजराई धबधबा, भाबंवली, एकीव धबधबा, सांडवली केळवली धबधबा, ठोसेघर धबधबा, उरमोडी धरण, जुंगटी तांबी पठार हि पावसाळी पर्यटनाची मुख्य ठिकाणे असून छोटे धबधबे ओढयाचें खळखळणारे पाणी दाट धुके सोसाट्याचा वारा व जोरदार पाऊस पर्यटकांचे खास आकर्षण ठरत असतात मात्र परिसर निसर्गसंपदेने सजला असून पर्यटन प्रवेशबंदीमुळे पर्यटकांविना ओस पडल्याने पर्यटनावर आवलंबुन असणारा परिसरातील हॉटेल व्यावसायही आडचणीत आल्याने बेरोजगारी वाढु लागली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!