किल्ले प्रतापगडच्या संवर्धन कामाची पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२४ | सातारा |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणार्‍या महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाची संवर्धन कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

किल्ले प्रतापगडच्या संवर्धन कामाची पाहणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, विजय नायडू आदी उपस्थित होते.

किल्ले प्रतापगड ऊर्जास्त्रोत असून प्रतापगडाच्या संवर्धन कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी प्रतापगड संवर्धनाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रतापगड संवर्धनाचे काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा प्रतापगड किल्ला होता, त्याच पद्धतीने काम व्हावे. कामात कोणतीही हयगय करू नका. या कामासाठी स्थानिक नागरिकांनीही सहकार्य करावे. त्यांची कोणतीही प्रकारे गैरसोय होणार नाही, याचीही दक्षता घेतली जाईल. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेतली जाईल, असे पर्यटन मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

किल्ले प्रतापगड परिसरात सुरू असलेल्या शिवसृष्टी कामाचीही पर्यटन मंत्री देसाई यांनी पाहणी केली.


Back to top button
Don`t copy text!