प्रतापगडच्या पायथ्याला शिवस्मारक उभारण्याला पर्यटन विभागाची मंजूरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ नोव्हेम्बर २०२२ । सातारा । किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची पुढील पिढ्या आणि पर्यटकांना ओळख होण्यासाठी अफजल खानाच्या कबरी जवळ गडाच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.अफजल खानाच्या कोथळा काढतानाचा पुतळा उभारणी तसेच लाईट व साउंड शो, सुरु करण्याचा निर्णय पर्यटन मंत्री मंगलप्रभास लोढा यांचा यांनी घेतला आहे.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे. प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज व अफजलखान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवला.याप्रसंगाची इतिहासात महत्वाची नोंद आहे. जी आजही कोट्यवधी शिवभक्तांना प्रेरित करीत असते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा (शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी तसेच लाईट व साउंड शो सुरु करण्याबाबत “हिंदू एकता आंदोलन, सातारा” व इतर संघटनांकडून शासनाला याबाबत विनंती करण्यात आली होती त्या अनुषंगाने पर्यटन मंत्री मंगलप्रभास लोढा यांनी पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या प्रकरणी सातारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तात्काळ प्रस्ताव मागविण्या आला आहे.


Back to top button
Don`t copy text!