सातारा तालुक्यामध्ये एकूण 36.12 टक्के पेरणी पूर्ण


दैनिक स्थैर्य । 19 जुलै 2025 । सातारा । मागील दोन महिन्यांपासून सातारा तालुक्यासह शेजारील भागांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पेरणी खोळंबल्या होत्या. परंतु आता पावसाने उघडीप दिल्यामुळे तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली आहे. सातारा तालुक्यामध्ये 14 जुलैअखेर एकूण 36.12 टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती सातारा तालुका कृषी विभागाने दिली आहे.

सातारा तालुक्यामध्ये आजपर्यंत 304.60 मिली मी. पाऊस झालेला आहे. सर्वात जास्त पाऊस अंबवडे सर्कलमध्ये 579.00 मि.मी. तर सर्वात कमी पाऊस शेंद्रे सर्कलमध्ये 217.50 मि.मी. झालेला आहे. पेरणी झालेल्या पिकामध्ये भात पिकाची पेरणी 4588.00 हे. क्षेत्रापैकी 367.00 हे. क्षेत्रावर पेरणी झाली असून 25.00 हे. क्षेत्रावर भात रोपवाटीका झालेली आहे.

तसेच एकूण 1332 हे. क्षेत्रावर लागवड झाली आहे. पिक वाढीच्या अवस्थेत असून पाऊस समाधानकारक आहे. खरीप ज्वारीची 355.00 हे. क्षेत्रापैकी 89.00 हे. क्षेत्रावर पेरणी झाली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे. नाचणी 172.00 हे. क्षेत्रापैकी 40.00 हे. क्षेत्रावर पेरणी झाली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे. भुईमूगाची 3799.00 हे. क्षेत्रापैकी 1000.00 हे. क्षेत्रावर पेरणी झाली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबिन पिकाची 21247.00 हे. क्षेत्रापैकी 8404.00 हे. क्षेत्रावर पेरणी झाली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

आडसाली ऊसाची 6135.00 हे. क्षेत्रापैकी 2530.00 हे. क्षेत्रावर लागवड झाली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे. आले पिकाची 380.00 हे. क्षेत्रापैकी 370.00 हे. क्षेत्रावर लागवड झाली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

हळद पिकाची 362.00 हे. क्षेत्रापैकी 384.00 हे. क्षेत्रावर लागवड झाली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तूर, मूग, उडीद व इतर कडधान्य पिकाची 417.00 हे. क्षेत्रावर मोगनाने पेरणी झाली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे. पाऊस जास्त असल्याने पेरणी कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


Back to top button
Don`t copy text!