टोटल एनर्जीजची ऑटोमोविलसह भागीदारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । मुंबई । एक फुल-स्टॅक मोबिलिटी स्टार्ट-अप असलेल्या ऑटोमोविलने, टोटलएनर्जीज मार्केटिंग इंडिया प्रा. लि. (टीईएमआयपीएल)ची तिचे विशेष लुब्रिकंट पार्टनर म्हणून असोसिएशन जाहीर केले आहे. या भागीदारी अंतर्गत, टीईएमआयपीएलद्वारे सर्व ऑटोमोविल आउटलेट्सना ऑटोमोटिव्ह लुब्रिकंटच्या प्रीमियम श्रेणीचा पुरवठा केला जाईल.

या असोसिएशनने टोटलएनर्जीजचे तांत्रिक कौशल्य आणि संशोधन क्षमता आणि ऑटोमोविलचे भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये नवीन युगातील ऑटो  सर्व्हिस चेन मॉडेल एकत्र आणले आहे. सध्या, ऑटोमोविल, भारतभर ७० सह-मालकीच्या कार्यशाळा आणि ५०० पेक्षा जास्त भागीदार गॅरेज चालवत आहेत.

ऑटोमोविल, बी२बी साठी नूतनीकरण सेवेसह टेक-सक्षम कार डीटेलिंग आणि कार सर्व्हिसिंग ऑफर करते. कंपनीने अलीकडेच १४ राज्यांमधील २० शहरांमध्ये प्रभावीपणे कार दुरुस्ती सेवा प्रदान करून, पूर्व आणि मध्य भारतात आपले कार्य विस्तारले आहे. भागीदारीचा एक भाग म्हणून, ऑटोमोविल आऊटलेट्स हे, नेटवर्कवर टोटलएनर्जीज सोबत को-ब्रँड करतील.

लुब्रिकंट्स फॉर साऊथ एशिया, टीईएमआयपीएलचे सीईओ सय्यद शकीलुर रहमान म्हणाले, “गुणवत्तेच्या (दर्जेदार) उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, तसेच आमच्या पाऊलखुणा विस्तारण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून, हे सहकार्य जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. कार दुरुस्ती आणि फुल स्टॅक ऑटो सर्व्हिस मॉडेल्स हा ट्रेंड बनत असल्यामुळे, एक प्रचंड असंघटित बाजार पुन्हा आकार घेत आहे. या भागीदारीमुळे ग्राहकांना त्यांच्या वाहनांसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि उत्कृष्ट लुब्रिकंट प्रदान करण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांमध्ये भर पडते, जेणेकरून ही वाहने त्यांची सर्वोत्तम कामगिरी करत राहतील.”

“नव्या युगातील ऑटो सर्व्हिस स्टार्ट-अप्सद्वारे, भारतीय रिपेअर मार्केटला २५ अब्ज युएसडी पर्यंत नेण्याची अपेक्षा आहे. वाहन रिपेअर मार्केटमध्ये वाढ होत असल्याने आणि त्यांची पुन्हा निर्मिती होत असल्याने, आम्ही या प्रक्रियेत मानकीकरण स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रदीर्घ काळासाठी, बाजार असंघटित राहिला आहे, परिणामी वापरकर्त्यांना विश्वासाच्या समस्या आणि परवडणाच्या क्षमतेच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अस्सल भाग आणि घटकांसह दर्जेदार सेवा देण्यामध्ये आम्ही पुढे प्रगती करत असताना, टोटलएनर्जीज सारख्या जागतिक ब्रँडशी सहयोग या प्रवासात महत्त्वाचा ठरेल, असे ऑटोमोविलचे सह-संस्थापक आणि सीबीओ, रमना सांबू म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!