दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२२ । मुंबई । रेस्टॉरंट बिलिंग सॉफ्टवेअर पुरवणाऱ्या पेटपूजाने, अलीकडेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या मराठी भाषेत ऑर्डर घेण्यास आणि रेस्टॉरंट व्यवस्थापित करण्यात कशी मदत करता येऊ शकते याची घोषणा केली आहे. पेटपूजा गेल्या अनेक दशकांपासून एफ अँड बी उद्योगात कार्यरत आहे असून रेस्टॉरंट आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना रेस्टॉरंट व्यवस्थापन आणि कामकाज सुलभ करण्यात मदत करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात कार्यरत आहे.
पेटपूजा पॉईंट ऑफ सेल (पीओएस) सिस्टीम रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांना ऑर्डर घेण्यास, स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांसाठी किचन ऑर्डर तिकिटे (केओटीएस) तयार करण्यात आणि ग्राहकांची बिले छापण्यास विनासयास मदत करते. रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांना सॉफ्टवेअर चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आणि कार्यक्षमतेने कार्य करण्यास मदत करण्यासाठी, पेटपूजा ‘प्रादेशिक भाषा’ वैशिष्ट्य ऑफर करते. या वैशिष्ट्यासह, संपूर्ण पेटपूजाचे सर्व पीओएस मराठी सारख्या कोणत्याही आवश्यक भाषेत भाषांतरीत केले जाऊ शकते. पेटपूजा बिलिंग सॉफ्टवेअर सेटिंगद्वारे ‘प्रिटिंग बिल, ‘प्रिटिंग कोट’ किंवा ‘ऑर्डर्स घेणे’ यासारख्या क्रिया मराठी भाषेत बदलल्या जाऊ शकतात. जर तुम्हाला तुमची बिले इंग्रजीत छापायची असतील परंतु स्थानिक शेफसाठी तुमचे केओटी मराठीत छापायचे असतील, तर सॉफ्टवेअर तुमच्या गरजेनुसार उपयोगात आणले जाऊ शकते.
तुमच्या पीओएसची भाषा स्थानिक भाषांमध्ये बदलण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी कार्ये सुलभ करते आणि तुमच्याच प्रशिक्षणाचा वेळ वाचवते. पेटपूजा कॅप्टन अॅप वापरणारा वेटरसुद्धा मेनू समजून घेण्यासाठी आणि ऑर्डर करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संपूर्ण मेनूचे मराठीत भाषांतर करू शकतो. एकापेक्षा जास्त बिलिंग उपकरणे वापरणाऱ्या मोठ्या साखळी रेस्टॉरंटसाठी, प्रत्येक टर्मिनलची भाषा बिलरच्या सोयीनुसार उपयोगात आणली जाऊ शकते. पेटपूजेचे हे महत्त्वाचे अतिरिक्त वैशिष्ट्य विनामूल्य आहे.
पेटपूजाच्या वृद्धी कार्यालयाचे प्रमुख, शैवल देसाई म्हणाले, ‘रेस्टॉरंट बिलिंग सॉफ्टवेअर हे फक्त बिले छापण्यापुरते मर्यादित नाही तर त्याच्या कामाकाज पैलूला मदत करते. बिलिंग सॉफ्टवेअरचे मुख्य वापरकर्ते हे रेस्टॉरंट कर्मचारी असून त्यांना केवळ व्यवस्थापन हाताळावे लागत नाही तर रेस्टॉरंटचे कामकाज सुलभ करण्यासाठी पीओएस सोबत समन्वयही साधावा लागतो आणि तंत्रज्ञान त्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत समजून घेण्यास सक्षम झाल्याने कर्मचाऱ्यांना रेस्टॉरंटचे कामाकाज सुलभ करण्यास मदत करते कारण भाषा त्यावेळी भाषा ही अडथळा ठरत नाही तर कामगिरीत सुधारणा करण्याचे साधन बनते.’