राज्यात सातारा जिल्हा वाहतूक पोलीसांची अव्वल कामगिरी


 

जुलैमध्ये तब्बल 48,762 वाहन चालकांवर कारवाई 

स्थैर्य, सातारा, दि. 8 : कोवीड-19च्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यामध्ये 48 हजार 762 जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि व्ही. ए. शेलार यांनी दिली.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोव्हीड-19च्या अनुषंगाने जिल्ह्यात कोव्हीड-19च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी लॉकडाऊन संदर्भातील नियम जारी केले होते. त्यानुसार ज्या वाहन चालकांकडून लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन झाले त्यांच्यावर वाहन चालकांवर ई-चलन मशीनव्दारे मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. मोहिमेमध्ये एकुण 48762 कारवाई करण्यात आली. जुलै महिन्यामध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहा. पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा सातारा संदिप भागवत यांचे मार्गदर्शना नुसार वाहतूक या विशेष मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. ही कारवाई महाराष्ट्र राज्यात सरासरी नुसार अव्वल ठरली आहे. 

सहा.पोलीस निरीक्षक व्ही. ए. शेलार व वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर कर्मचारी यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली असून लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर यापुढेही विशेष मोहिम राबवून तीव्र कारवाई करण्यात येणार आहे, असे  सपोनि व्ही. ए. शेलार यांनी नमूद केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!