स्टडी ग्रुपच्या सहयोगी युनिव्हर्सिटी क्रमवारीत शीर्षस्थानी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२३ । मुंबई । स्टडी ग्रुप या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रदाताने घोषणा केली की, त्यांचे चार युनिव्हर्सिटी सहयोगी – डरहॅम युनिव्हर्सिटी, लिव्हरपूल जॉन मूर्स युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड आणि युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स यांनी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज बाय सबजेक्ट २०२३ च्या प्रतिष्ठित टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. विभिन्न मेट्रिक्सवर लक्ष केंद्रित असलेल्या या जागतिक रँकिंग्जचा संभाव्य विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयामधील आघाडीच्या युनिव्हर्सिटीजना ओळखण्यामध्ये मदत करण्याचा मनसुबा आहे. स्टडी ग्रुपचे यूके व आयर्लंडमधील १५ युनिव्हर्सिटी सहयोगी टॉप १०० मध्ये आहेत. शैक्षणिक व नियोक्ता प्रतिष्ठा, फॅकल्टी रिसर्च आणि इतर निर्देशकांची बारकाईने तपासणी करत रँकिंग्ज दिले जातात. यादीमध्ये जवळपास १,६०० संस्था आणि त्यांच्या संबंधित विषय कोर्सेसचा समावेश आहे.

स्टडी ग्रुप उल्लेखनीय अध्ययन अनुभव, विशेषीकृत अध्यापन आणि युनिव्हर्सिटींशी कनेक्ट असलेल्या इंटरनॅशनल स्टडी सेंटर्समधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पाठिंबा या तरतूदींच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या यूके व आयर्लंड सहयोगी युनिव्हर्सिटींमध्ये प्रवेश घेण्यास व यशस्वी होण्यास साह्य करते.

स्टडी ग्रुपचे यूके व आयर्लंडमधील युनिव्हर्सिटी पार्टनरशिप्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मार्क कनिंग्टन म्हणाले, ‘‘क्यूएस ग्लोबल रँकिंग्ज बाय सबजेक्टमध्ये सामील झालेल्या सर्व युनिव्हर्सिटींचे अभिनंदन. आम्हाला आमच्या अनेक सहयोगींना प्रख्यात टॉप १० मध्ये स्थान मिळण्यासह हे रँकिंग्ज मिळाल्याचा  आनंद होत आहे. नियोक्ता व शैक्षणिक प्रतिष्ठेवर लक्ष केंद्रित करण्यासह क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज बाय सबजेक्ट आमच्या संभाव्य विद्यार्थ्यांसाठी बहुमूल्य संसाधन आहे आणि अनेक पद्धतींपैकी एक म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या उद्दिष्टांशी सुसंगत अभ्यासक्रमांशी जोडत आहोत याची खात्री घेतो.’’


Back to top button
Don`t copy text!