फलटण आगार जिल्ह्यात अव्वलस्थानी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण एस.टी. आगाराने भाऊबीज दिवशी विक्रमी उत्पन्न मिळवून सलग तिसर्‍या वर्षी सातारा विभागात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

विभाग नियंत्रक रोहन पलंगे व विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी प्रभारी स्थानकप्रमुख सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे व सर्व पर्यवेक्षक यांच्या सहकार्याने ७७ बसेसद्वारे उत्कृष्ट नियोजन करून विविध मार्गावर जादा बसेसचे नियोजन करून एकूण २८,७९६ किलोमीटर करून तब्बल १२,२६,७३२/- एवढे उत्पन्न मिळवून सातारा विभागात सलग तिसर्‍या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल बोलताना रोहित नाईक यांनी सर्व चालक-वाहक, कार्यशाळा कर्मचारी, अधिकारी सर्वांचेच सहकार्य लाभल्याचे नमूद केले.

या यशाबद्दल विभाग नियंत्रक रोहन पलंगे, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी फलटण आगाराचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!