
दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑक्टोबर २०२२ । सातारा । शिक्षकी पेशा अत्यंत पवित्र आहे त्यामध्ये जबाबदारी आणि बांधिलकीची जाणीव आहे एखाद्या वेळेस एखाद्या अभियंत्याकडून इमारत चुकली तर त्याचे नुकसान भरून काढले जाऊ शकते मात्र एखाद्या पिढीवर संस्कार चुकीचा गेला तर त्या पिढीचे नुकसान होऊ शकते म्हणून शिक्षकांनी उद्याची पिढी अत्यंत जबाबदारीने घडवली पाहिजे असे प्रतिपादन सांगलीचे सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले
सातारा पालिका शिक्षण मंडळाच्या वतीने आदर्श शिक्षक शाळा आणि शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराचे वितरण येथील शाहू कलामंदिर येथे करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर सातारा पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मारुती भांगे,नगरपालिका शिक्षक संघटनेचे अजित साळुंखे, मुख्याध्यापक विलास शिंदे, मुख्याध्यापिका कविता बनसोडे, मुख्याध्यापक पुनाजी गवारी व मुख्याध्यापक नंदकिशोर वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
हंकारे पुढे म्हणाले शिक्षकाने स्वतःचे मन आणि शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे शिक्षक आणि अभिनेता यांच्यामध्ये फारसा फरक नसतो त्याने स्वतःचे मन सकारात्मक रित्या आनंदी ठेवले तर त्याचा आदर्श पुढची पिढी घेत असते एखाद्या वेळेस एखाद्या डॉक्टरकडून एखाद्या अभियंत्याकडून काही त्रुटी राहिल्यास त्याचे दुष्परिणाम त्या त्या संदर्भात भोगावे लागतात शिक्षकांच्या हातून असा पिढीचा संस्कार जर कमी पडला तर त्या पिढीचे नुकसान होऊ शकते म्हणून शिक्षकाने अत्यंत जबाबदारीने उद्याची पिढी घडवावी .ज्ञान आणि वर्तन यांनी सात्विक आणि सशक्त त्यांनी राहायला हवे असे प्रतिपादन त्यांनी केले दीड तासाच्या त्यांच्या या उद्बोधक व्याख्यानांमधून किस्से विनोद गमतीजमती नकला अशा विविध माध्यमातून शाहू कला मंदिर चे सभागृह त्यांनी हास्यविनोद बुडवून टाकले
मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून तानाजी दत्तू मस्के नगरपालिका शाळा क्रमांक 11, शैला राजेश तिरमारे शाळा क्रमांक 16 ,शिल्पा सतीश कांबळे शाळा क्रमांक 1, सकीना शब्बीर नालबंद शाळा क्रमांक 13,मंगल अविनाश साळुंखे नवीन मराठी शाळा, विश्वासराव चंद्रसेन साळवे मराठी मिशन युनियन स्कूल, अनुपमा प्रशांत साळवी आदर्श कर्मचारी मराठी मिशन युनियन स्कूल, आणि शिर्के शाळा शाळा क्रमांक आठ नगरपालिका शिक्षण मंडळ यांना आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासनाधिकारी मारुती भांगे यांनी केले सूत्रसंचालन मुख्याध्यापिका कविता बनसोडे यांनी केले या कार्यक्रमास नगरपालिका शिक्षण मंडळाचे समस्त कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थी वृंदाव उपस्थित होते