आज सोन्याच्या दरात घट तर चांदीत सौम्य वाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२: मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसत आहे. भारतीय कमॉडिटी मार्केटमध्ये आज सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसून आली आहे. एमसीएक्सवर आज डिसेंबरच्या वायद्याच्या सोन्याच्या भावात 0.17 टक्क्यांची म्हणजे 85 रुपयांची घट होऊन प्रति 10 ग्रॅमला 50 हजार 410 पर्यंत गेले आहे. मागील सत्रात सोने प्रति 10 ग्रॅमला 50 हजार 495 रुपयांवर बंद झाले होते. 

भारतीय सराफा बाजारात सोने जरी घसरले तरी चांदीच्या दरात सौम्य तेजी दिसून आली आहे. एमसीएक्सवर डिसेंबरमधील चांदीमध्ये 0.02 टक्क्यांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 14 रुपयांची सौम्य वाढ दिसली आहे. ऑगस्ट महिन्यात सोने, चांदीचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेले होते. 

जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर मागील आठवड्यातील सर्वात कमी किंमतीवर गेले आहे, याचे कारण म्हणजे अमेरिकेच्या प्रोत्साहन पॅकेजच्या अनिश्चिततेमुळे डॉलर मजबूत झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे.

भारताकडे सोन्याचा किती साठा आहे-


वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) अहवालानुसार भारतात सध्या 653 मेट्रिक टन सोने आहे. यामुळे सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे. 

दिवाळीनंतर सोन्याचे दर वाढू शकतात-


दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढू शकतात असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठू शकते. दिवाळीनंतर सोने प्रति १० ग्रॅमला 53 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!