साखर अन मिठाची किंमत, त्याच्या शुभ्र रंगावरून नव्हे, तर चवीवरून कळते.
माणसाची किंमत त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे, तर शुध्द कृतीवरून कळते.
काळी माती, काळा बुक्का, काळा विठोबा, काळा तवा, काळा डेरा, काळं नभ, काळी पोतं, काळा करदोटा, काळी माणसं, काळं काजाळ, काळं काळीज कळायला गोरी कातडी असून चालत नाही. तर शुध्द कृती महत्त्वाची आहे. सगळ्या रंगाला सामावून घेणारा काळा रंग व्यापक आहे.
आपणाला मीठ व साखर दिसायला सारखेच दिसत असेल तर तो आपल्या नजरेचा दोष पण वापरताना गल्लत केल्यास सत्यानाशच होणार. साखरेचे गोडवा अनू मीठचा खारेपणा यात साम्य आहेच. पण वापरताना तारतम्याने वापर केल्यास जीवन सार्थकी लागेल.
साखरेचे व मीठाचे (जादा) खाणार त्याला लवकर देव नेणार. मर्यादा असावी. साखरेला तिच्या गुणधर्माने मुंग्या लागणार व मीठाच्या गुळण्याने हातपायातील मुंग्या जाणार.