आज जागतिक पर्यावरण दिवस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


आज ५ जून जागतिक पर्यावरण दिवस जो दरवर्षी संपूर्ण जगात वेग वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. पर्यावरण म्हणजे आपल्या आजू बाजूचा परिसर यात सजीव व निर्जीव घटक आहेत. सूर्य, हवा, पाणी, पृथ्वी, व आकाश हे पर्यावरणाचे प्रमुख घटक आहेत. आज जग भारत ऊर्जा वर पर्यावरण संवर्धन करणे व प्रदूषण कमी करण्यासाठी जागरूकता वाढवत आहे. प्रदूषणामुळे होणारे निसर्गाचं असुंतुलन त्यात महापूर, रोगराई, दुष्काळ, भूकंप, त्सुनामी ढग फुटी,अति तापमान इत्यादी नैसर्गिक आपत्तीना मानवाला तोंड द्यावे लागत आहे.

आज या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वाई तालुकयातील ओझर्डे गावचे भूमी पुत्र, कृषी सम्राट अविनाश मारुती फरांदे यांच्या कृषी क्षेत्रातील कामगिरी बद्दल त्यांचा लेखा-जोगा. लहानपणापासून पाणी, माती, झाडे यांच्या सानिध्यात असलेले अविनाश यांना शेतीची खूप आवड. आधुनिक शेती व पर्यावरण संवर्धन यावर नवीन नवीन काही तरी करणे हा त्यांचा ध्यास होता.

यातूनच 1984 पूर्वी पीडिजात असलेल्या अडीच एकर खडकाळ माळरानात आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने त्यांनी सागवान जातीची झाडे लावण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता निलगिरी, पेरू, चिक्कू, आंबा, सीताफळ, फणस,  रामफळ, बदाम, नारळ, चंदन, चिंच, सुपारी, जांभूळ अशी अनेक प्रकारची जवळपास 1000 ते 1200 झाडे लावली गेली.

कुटुंबातील सर्व सदस्याचे सहकार्य व साथीमुळे महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च असा 2002 सालाचा वनश्री पुरस्कार व 2003 सलाचा भारत सरकार तर्फे दिला जाणारा पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च असा इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार मिळाल्यामुळे अविनाश भाऊंना प्रोत्साहन मिळाले. त्यांनी दोन्ही पुरस्कार ओझर्डे गावाला मिळऊन देण्यास खारीचा वाटा उचलला.

आज पर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी वनराई बंधारे बांधले, वृक्षसंवर्धन केले, शेतामध्ये शेतकरी मेळावे आयोजित केले, गावोगावी कृषिविज्ञान मंडळे स्थापन केली, आज ते त्यांच्या शेतामध्ये कंपोस्ट खत, बायोगॅस निर्मिती यांसारखे उपक्रम राबवतात.

परंतु अपुरे मनुष्यबळ व 2014 साली आई वडिलांचे वृद्धापकाळाने झालेले निधन, मुलांचे शिक्षणासाठी बाहेर जाणे व पहिल झाड लावल्यापासून ते  3 मार्च 2019 पर्यंत सोबत असणाऱ्या भाऊ रविंद्रच हृदयविकाराने जाणं यामुळे झाडांकडे दुर्लक्ष झाले.

परंतु खचून न जाता आपले कृषी क्षेत्रातील कार्य त्यांनी  चालूच ठेवलेले आहे. त्यांच्या या कार्याला माझा सलाम व भविष्यात त्यांचे अशीच पर्यावरण व कृषी क्षेत्रात प्रगती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शेती बरोबर त्यांनी राजकारणातही आपला एक ठसा उमटवला आहे. भारतीय जनता पक्षातून त्यांनी पक्ष्याचे सातारा जिल्हा अध्यक्ष पद निभावले व आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, महाराष्ट्र राज्य म्हणून काम करत आहेत.

तर सांगायच म्हणजे येवढच की आयुष्य खूप सुंदर आहे. झाडांसारखा त्याग माणसानं करण्याची गरज नाही. तर फक्त झाडं लावण्याची गरज आहे. झाडांमधून मी  अनुभवलेल समाधान, शांती, प्रसन्नता, त्याग, मोठेपणा हे गुण तर वेगळेच. खरं सांगायच तर माणसांच्या ह्या गर्दीतून झाडांच्या वर्दीतही रमाव आणि प्रत्त्येकान एक तरी झाडं लावाव हिच तळमळ.

 जगन्नाथ बोराटे -जावली सर्जापूर मो .९८१९६३१२६६


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!