
१४ एप्रिल. आमच्या सर्वांचा लाडका सहकारी मित्र किशोर देशपांडे यांचा वाढदिवस, खरोखर मित्र, सहकारी, भाऊ म्हणून वागणारा असंच त्यांच नाव घ्यावं लागेल. आम च्या सर्वांच्या अडचणीत कोणत्याही प्रसंगात फोन केल्यास कधीही धावून येणारा मित्र, याची जाण आमच्यासारख्या मित्रांना आयुष्यभर राहील. त्यांचा स्वभाव परखड, स्पष्ट बोलणे, चुकल्यास चूक झाल्याचे सांगण्यासही कधीही मागेपुढे न पाहणारा एक मित्र. त्यांचा लहानपणापासून हरहुन्नरी स्वभाव. सर्वांना मदत करण्याची प्रवृत्ती. हे त्याचे चांगले गुण आहेत. त्यांचा सर्वात चांगला गुण कोणता असेल तर त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकास सुख, समाधान, मनशांती लाभेल असे ते वागातात. काळजीत असणाऱ्या प्रत्येकाला मौलिक सल्ले देतात. यापेक्षा आयुष्य सुंदर असे काय असते.
आमच्यासारख्या मित्रांच्या आयुष्यात अनेक चांगलेवाईट प्रसंग आले. परंतु सर्व प्रसंगांना धीराने सामेरे जाण्याचा मौलिक सल्ला ते देतात.
किशोर देशपांडे हे श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाचे सचिव, फलटण नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती . ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुना-थराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विश्व-ासू सहकारी म्हणून त्यांची निवड केली आहे.
पैशाने श्रीमंत असणारी माणसे पावलापावल-वर भेटतात. पंण मनाने श्रीमंत असणारी माणसे भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात. अशा सोन्यासारख्या माणसाला शतायुषी आरोग्य लाभावे. यांचा सहवास सातत्याने लाभावे, ही प्रभूचरणी प्रार्थना!
आपणावर परमेश्वराची कृपा सदैव असेल, परम `श्वराचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव वाहत राहतील. परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर सदैव असु दे. तुमच्या भविष्यातील त्यांच्या कृपेचा प्रकाश असाच उजळत राहू दे. हीच आपल्या वाढदिनी आम्हा सर्व मित्रांतर्फे शुभकामना !