आज ८ मार्च – जागतिक महिला दिन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


अनादि कालापासून स्त्री ला चूल अन् मुल हा दुय्यम दर्जा प्राप्त झाला. पुरुष प्रधान संस्कृती, वडीलांची वंशपरंपरेने स्थावर मलामत्ता मुलांकडे, वंशाचा दिवा या समाज रुढ पध्दतीने स्त्री कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत केला. परक्याच धन, डोईला भार, हुंड्याला कार अश्यातून शिक्षणाचा अभाव, हक्क कर्तव्य यापासून वंचित यातूनच ब्रिटिश सत्तेने समाज सुधारणे बरोबरच भारतीय महिलांची रुढी परंपराच्या जोखडातून मुक्तता करण्यास सुरुवात केली. अनेक भारतीय समाजसुधारकांनी त्यांना पाठबळ दिले.

क्रांतीज्योती सावित्री माईने शिक्षण कवाडी खुली केली. तिच पाऊल उंबरठ्याच्या बाहेर पडून मुक्त संचार सुरु झाला. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विविध क्षेत्रातील तिची गगन भरारी अचंबित करणारी ठरली. पण त्यासाठी तिला अनेक बंधनाच्या साखळ्या तोडून प्रसंगी प्राणाची आहुती देऊन मुक्ततेचा श्वास घेता आला.

२१ व्याशतकातील महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काकंणभर पाऊल समर्थ पणे पुढेच पडत आहे. अभिमान आहे. दशभुजा महालक्ष्मीच्या रुपात आजची महिला घर दार, शेती वाडी, व्यवसाय, नोकरी संभाळून अपत्य संगोपन, संस्कार, नातेवाईक, छंद, आवडी निवडी या सर्वांना न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दमछाक होताना दिसतेय. तरी न डगमगता, न थांबता, काही पुरुषी नजरेला भिडून प्रसंगी समोरी जाऊन ताठ मानेने खंबीरपणे उभी दिसते. तेव्हा तिच्यात मातृत्वाची व कर्तृत्वाची छाप दिसून येते.

आजही समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित वृत्तीचा आहे. तिला वाव दिल्यास ती क्षितीज कवेत घेऊन गगनाला गवसणी मारेल. फक्त आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा. सृजनतेच प्रतिक,मांगल्याची ज्योत, सहनशिलतेची ढाल, लढण्याचं हत्तीच बळ, मुलूख मैदानी तोफ, संयमीपणाचा किनारा, अन्यायाची चीड याची पदोपदी जाणिव असणारी महिला शक्ती क्षणात वावटळीच रुप धारण करुन होत्याच नव्हतं करणारी रणचंडिका रुप घेत तशीच वीणा धारी सरस्वती, अखंड लक्ष्मी वरदहस्त माऊली रुपात भेटते.

जिथं लेकी सूनांचा सन्मान तिथं सरस्वती लक्ष्मी श्रीनिवास

आपलाच ज्ञानाई – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!