
कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो. परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो. डोळे आणि कान चार बोटांचे अंतर नव्हे. तर जमीन अस्मानचा फरक आहे. कानाने ऐकल्यावर विश्वास ठेवण्यापरीस डोळ्यांनी बघितलेल्या घटना ख-या असतात. तसेच कान व डोळे यापरीस मन सज्ज असावे. मन सर्व इंद्रियांचा शिरोमणी आहे. मन जळी स्थळी काष्ठी पाषाणी रमत नाही. शस्त्र अशस्र मारु शकत नाही. मन फक्त नम झाल्यावरच जागेवर येते. मनातलं समजणे काळासुद्धा अशक्य आहे. मनाची घालमेल, गुंतागुंत, हेळसांड, मान सन्मान, उपेक्षा, भावनिक द्वद्वव हे समजणे व त्यावर उपाय योजना करणे मुश्किल काम आहे.
पण मनावर ताबा जगावर ताबा हे सिद्ध करण्यासाठी उपासना, वाचन, लेखन, श्रवण, बोलणे, व्यक्त होणे, रमणे, भंम्रती, विश्वास, श्रध्दा यावर ठाम विश्वास ठेऊन वाटचाल केल्यास मनाचे ऐकावे.