वाढदिवसाला फळं कापून शेतकऱ्यांना मोठे करा, मदत करा. केक ऐवजी कलिंगड कापा खरबूज कापा, सफरचंद, पेरू, पपई, सीताफळ, आंबा या फळांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक सारखाच वापर करावा. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला बाजार वाढेल. जर शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर आपल्या वाढदिवसा निमित्ताने एकाच शेतकऱ्याचं फळ खरेदी करून त्याला मदत होईल. आपल्या कृतीतून उतरवला तर शेतकऱ्यांच्या मालाला एक चांगला दर भेटेल.
कारण दररोज असंख्य लोकांचे वाढदिवस असतात आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने केक ची किंमत दोन तीनशे रुपये असते आणि यापैकी एकही फळ तीनशे रुपये किलो नाही जर आपण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा केक ऐवजी फळांचा वापर केला. तर निश्चितच आपल्या आरोग्याला सुद्धा याचा फायदा आहे. केक मध्ये असणारे केमिकल वेगवेगळ्या रासायनिक मिश्रणापासून आज आपण अगोदरच त्रस्त झालेला आहेत उत्तम आहार मिळत नाही.
त्यातून असे पाश्चात्य देशातल्या संस्कृतीचा वापर आपण जर केला, तर महाराष्ट्रातला देशातला शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा येणाऱ्या पिढीतल्या तरूणांनी विचार केला पाहिजे. शहरांमध्ये असंख्य लोक केक वरती खर्च करतात केक तोंडाला लावतात फेकून देतात. परंतु आपण कापलेला केक आपल्या वाढदिवसानिमित्त हा जर फळाचा असेल तर तो प्रत्येक आपला मित्र जो आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला आहे. तो त्याची चव आनंदाने चाखू शकतो. आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला उत्तम आहार तुमच्या माध्यमातून मिळू शकतो. हा पण आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. हा विचार सर्वांना सांगावा.
माझं तर नक्कीच ठरलंय की माझ्या कुटुंबातील सर्वाचा वाढदिवस दणक्यात फळं कापून साजरा करायचा. वाट कसली बघताय चांगली कृतीची सुरु आपल्यापासून. शुभस्य शीघ्रम.