आपल्या सुखाच्या कल्पना म्हणजे हम दो हमारे एक दो, आई बाप फेक दो. या वृत्तीने आपण गाव सोडून शहरवासीय होऊन अभासी दुनियेत वावरताना दिसतोय. गाडी, बंगला, नोकर, चाकर, मौजमजा याच संकोचित रामराट्यात आपण ख-या सुखाला पारखे होत आहे.
आई वडीलांना शहरात करमत नाही. मान्य आहे. ते जुन्या वळणाचे आहेत. मान्य आहे. व्यवस्थित वागत नाहीत. मान्य आहे. आमची प्रतिष्ठा, मानसन्मान याला ह्यांच्या उपस्थितीने बाधा येतंय. ही विचार सरणी म्हणजे स्वार्थी पणाचा कळस झाला. सासूरवाडीचे जसे जवळचे वाटतात तसे आपले ही वाटावेत. नातवंड त्यांच्या कुशीत हीच आजी आजोबांची खुशी विसरु नका.
आपल्या जीवनातील प्रत्येक आनंदी क्षणाला माता पित्याला सहभागी करुन घेणे ही सुखमय भावना वाढीस लागावी. उतार वयात कर्त्यासवरत्या लेका सूनाने मायेची ऊब, आपुलकीच दोन शबूद, येळच्या येळंला भाकर तुकडा दिल्यास ती उभायत सुखाची बरसात आपणांवर अखंड करणार.
श्रावण बाळ अथवा भक्त पुंडलिक यांच्या एवढी सेवा नाही करता आली तरी चालेल. पण येता जाता जेवण झालं का ? बरं आहे का ? हवे नव्हे एवढी विचारपूस त्यांच्या जगण्याला बळ देऊन त्यांचा दुवा आपणाला दव्या पासून दूर ठेवणार. मातापित्याच्या चरणी स्वर्ग सेवा.