आज १९ मार्च – शेतकरी स्मृतीदिन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साधारण ३५ वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे पहिली शेतकरी सहकुटुंब आत्महत्या १९ मार्च १९८६ रोजी झाली. ते सत्र आजपर्यंत चालूच आहे. ही आपल्यासह सरकारला काळीमा फसणारी बाब आहे.

१९ मार्च शेतकरी स्मृतीदिनी आपण सर्वांना जमले तसे सहाभागी होऊन जनजागृती करु या. या दिनी दिवसभर अन्नत्याग आंदोलन करुन आपल्या शेतकरी जगाच्या पोशिंद्यासाठी सहवेदना व्यक्त करणे.

खरंच शेतक-यांची अवस्था सध्याच्या काळात फारच बिकट झाली आहे. संप, मोर्चा, आंदोलन करुन ही हमीभाव नाही. भरवसा उत्पन्न नाही. शेतकऱ्यांच्या लेकरांच्या लग्न विधीस विलंब यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. आत्महत्या रोखण्यापासून आपण आपआपल्या परीने प्रयत्न केल्यास मार्ग निघेल. शेतकऱ्यांनाकडून थेट खरेदी, घासघीस न करणे, शेतकरी हिताचे निर्णय तसेच बघण्याचा दृष्टिकोन बदलणे. शेतकरी स्मृतीदिन साजरे करणे ही लाजरीवाणी बाब आहे. पण यातून आपण जनजागृती, प्रोत्साहन, हिंमत, लढण्याच बळं, मदतीचा हात दिल्यास जगाचा पोशिंद्धा बलवान होईल. आत्महत्याने अनेक कुटुंबाची वाताहत होते.

चला तर शेती माती संस्कृती आबाधित राखण्यासाठी आपण आपल्या परीने खारीचा वाटा उचलू या.

हे ही दिवस जातील

आपलाच किसान पुत्र – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!