आज १७ मार्च – हुतशानी (होळी) पौर्णिमा अर्थात शिमगा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


आपल्या भारतीय संस्कृती बारा महिन्याच्या पूनवला सण असतोच. मराठी शेवटचा फाल्गुन मास यात होळी हा पवित्र सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. बोंबचा महिना याच मतितार्थ मार्च समाप्ती देणं घेणं, नवं जुनं करण्याचा महिना असल्याने भागवता भागवता बोंबच होते.

बोंबलणे म्हणजे शंख करणे. अपप्रवृत्तीवर सतप्रवृत्तीचा पगडा असावा म्हणून बोंब करणे.पड्विकाराचे होळीत दहन करणे.

सायंकाळी सार्वजनिक / देऊळ / घरासमोर गव-या, ऊस, एरंड यासह वाळलेली लाकडे टाकून होळी पूजन व प्रज्वलन करतात. पुरण पोळीचा नैवेद्य, सर्प, विंचू तत्सम दंशरुपी प्रतिकात्मक दहन, पाच प्रदक्षिणा मारुन बोंबलणे याचा मतितार्थ आपल्यातील दंश व विनाशकारी वाणी त्यागणे व शंख करुन आत्मशुद्धी होळी साजरी करणे.

बारामाहीचा शिमगा मंजे भगवंताकडे अवगुणाची होळी अन् सद्गुणाची मागणी करणे. नव्या पिढीला हा अस्सल मराठामोळा सण साजरा करुन चांगल्या परंपरा जोपासना करायला लावणे. तिन्हे सांजेला नव्या गव्हाच्या पुरणपोळ्या, कटाची आमटी, गुळवणी ह्या पंचपक्वानाचा नैवेद्य व देव्हा-यात मायराणी पूजन सोहळा संपन्न करुन सहकुटुंब परिवारासहित आस्वाद घेणे.

होळी रे होळी पुरणाची पोळी अन् चांगल्या जगण्याची हाळी

आपलाच होलिका पूजक – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!