आज १४ मार्च – इतरांना संपविण्यातच आपली वाट लागणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जो इतरांना संपविण्याची तयारी करतो,तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो. आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवाण्याचे कार्य करा. अन्यथा आपली केव्हा वाट लागेल. हे सुद्धा कळणार नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे.

खरंच जीवन जगत असताना आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये. तसेच इतरांना मदत करता आली नाही. तरी अडथळा ठरु नये. दुसऱ्याच भलं बघण्याची मानसिकता हे सुसंस्कृत मानवाच लक्षण आहे.

बघतोच, संपवतोच,ठेवतच नाही, यासारख्या वृत्तीने आपणच आपला घात करुन घेतो. गुळाने मरणा-याला इख देऊन मारण्यात पुरुषार्थ नाही. जो तो त्यांच्या चांगल्या वाईट कर्माची फळे भोगतो. आपण निमित्त मात्र होऊ नये. मौन सर्वार्थ साधनम् या वचनाप्रमाणे शांत, संयम, सहनशीलता, धीरता या चतुसुत्रांचा वापर केल्यास चारी दिशांना तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध पसरणार.

चांगले केल्याने चांगले होईना, तवा डबक्यात दगड मारुन शिंतोडे उडतात. म्हण्यात काय अर्थ आहे. चांगली वाट दाखवताआली तर दाखवा पण चुकीच्या वाटेला दुसऱ्याना नेण्यातच आपण त्या वाटेला कवा पोहचलो. ते वाट लागल्याशिवाय कळणार नाही. वाटेच्या वाटेला लागण्यापरीस वाट्याला आलेले चांगले उपभोगणे व चुकीचे त्यागणे महत्वाचे. शेवटी वाट लावणाऱ्याची वाट वाट लावते. आपण वाटच पाहणार का ?

चांगल्या वाटा शोधा अन्यथा आपली स्वतःची पाऊलवाट तयार करा

आपलाच वाटसरू – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!