मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्री जांभेकर यांनी पहिले दर्पण वृत्तपत्र सुरु केले. भाऊ महाजन (प्रभाकर), लोकमान्य टिळक (केसरी, मराठा), महात्मा फुले (दीनबंधू), राजाराम मोहन रॉय (संवाद कौमुदी), महात्मा गांधी (हरिजन), बाबासाहेब आंबेडकर (मूकनायक), प्र. के. अत्रे (मराठा) इत्यादी वृत्तपत्रे समाज जागृती, स्वातंत्र्य चळवळी, सुधारणा यासाठी महत्वाचे कार्य केले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्र व पत्रकारिता ओळखली जाते. पत्रकार बंधूनीं खऱ्या अर्थाने सामाजिक स्वास्थ्य नियंत्रण करुन उन, वारा, परिवार याचा विचार न करता लेखणीद्वारे समाजहित जोपसले. प्रसंगी जीवघेणा हल्ला, धमक्या प्रलोभणे याला न जुमानता सेवेचे व्रत सुरुच आहे. लेखणीने भल्या भल्यांची मस्ती जिरवून उपेक्षित घटकांना न्याय दिला आहे.
मायबाप सरकारने पत्रकारांना संरक्षण, पेन्शन, विमा कवच, गृहसंकुल, मुलांना शिक्षण कामी आर्थिक मदत केल्यास समाज स्वास्थ्य टिकून राहिल. पत्रकारिता हे व्रत असून हातातील लेखणीने अनेकांची कामगिरी कार्य जगाला माहित झाल्याने अनेकांना प्रेरणा मिळाली. सध्या इलेकट्रोनिक व डिजिटल मिडीयातील पत्रकारितेचा दर्जा घसरत आहे.
सर्व पत्रकार बांधवांना हास्यमय व निरामय आयुष्य लाभो.