आईला लेकच जवळची असते.हा भ्रमच आहे.लेक ही अंगणातील चिमणी असते.चारापाणी घटका भर रहाते. अन् भूरर्कन सासरी निघून जाते. आईची मायारुपी उर्जेने ती नेटाने संसाराला लागते.सूनं मात्र शेवट पर्यंत असते. सासू तिच्यासाठी आयुष्यभराची पूंजी ठेवते.
लेकीला आपण परक्याच धन म्हणून बघतो.पण परकंच सूनेच्या रुपाने बोलून चालून भाडून तिलाच सारं देऊन माफ करते. लेकीच माहेरपण, ओटीभरण, बाळंतपण करुन आई मोकळी होती. पण सूनेच्या लेकराला मात्र दूधावरच्या सायीवानी जपते.सासू सूनेवर भांडण न करता. मोठ्या मनाने स्वतःची जागा तिला देते.
लेकी सूनेच्या ह्या गोष्टी रुढार्थाने आल्या आहेत.खरंच लेक खानदान,वंश ,संस्कार रुपी धान्य पेरुन जाते.तर सून धान्यांने भरलेली अदुली ओलांडून गृहलक्ष्मी होऊन जाते.लेक तिच्या घरीची पाहुणी तर सून मालकीण असते.
हा सारा खेळ नियताचा व शब्दाचा आहे.आईच ओरडणे लेकीला समजावणं तर सासूचे ओरडणेसूनेला बोलणं वाटतंय.लेकी सूना एकाच्या नाण्याच्या बाजू आहेत.