आज १७ एप्रिल – जिव्हा हाच जिव्हाळा नायतर उन्हाळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


बिन हाडाची पण सारी हाडं खिळखिळी करणारी, माणसं जोडणारीअन् तोडणारी, एक नार बत्तीस गडी बेजार, ग्वाड अन् द्वाड बोलणारी अहो बरोबर तुम्ही ओळखली. तुमच्या अनुभवाचे बोल. छत्तीस नखरेवाली जीभच (जिव्हा). ह्याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा

यासाठीच रोज किमान खालील पाच श्लोक न अडखळता जोरात दिवसांतून एकदातरी म्हणा.

नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें।
प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें॥
खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें।
तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें॥१॥

झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी।
लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी॥
हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी।
कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं॥२॥

कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं।
घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं॥
तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं।
धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं॥३॥

भरभरित भरारी भर्भराटे भरारी।
थरथरित थरारी थर्रथराटे थरारी॥
तरतरित तरारी तर्तराटे तरारी।
चर्चरित चरारी चर्चराटे चरारी॥४॥

रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।
गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी॥
न धरित जन मानें लोक गेलें निदानें।
हरिजन भजनानें शांत केलें दयेनें॥५॥

न अडखळता जोरात म्हणण्याचा प्रयत्न करून पहा.१००% फरक पडणार.

जिव्हा संयमी ठेवल्यास जग जिंकते.

आपलाच जीव्हायात्री – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!