‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे एक लोकप्रिय व गाजलेले नाटक.
लेखक, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर म्हणजे महाराष्ट्राचे छोटे गडकरी म्हणून रसिकांनी गौरविलेले व्यक्तिमत्व. १९ जून १९६४ साली भावे नाटयगृह, सांगली येथे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला, ते नाटक आजतागायत रसिकांच्या पसंतीस उतरलेले आहे. अभिनेत्री आशा काळे, गणेश सोळंकी व सुभाष हे पात्र अजरामर केलेले बाळ कोल्हटकर यांनी त्या काळात दोन हजाराच्या वर प्रयोग केले होते. आज त्या नाटकाला ५४ पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली आहेत.
१९६४ साली हे नाटक पहिल्यांदा सादर केले गेले. त्यावेळी त्याने लोकप्रियतेचे उच्चांक निर्माण करत चौदाशे प्रयोगांची मजल गाठली होती. त्यानंतर १९८४ साली विजय गोखले आणि निवेदिता जोशी-सराफ यांनी हे नाटक सादर केले होते. या नाटकाचा लूक साठीतला असला तरी अभिनयाची शैली आजची आहे. त्यामुळे आजच्या पिढीलाही हे नाटक आपलेसे वाटून ते भारावून जातात, बाळ कोल्हटकर यांचे लेखन मुळातच खूप सुंदर आहे. त्यांच्या दोन-दोन ओळींच्या कविता खूप गहन अर्थ सांगून जातात.
संकलन. संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट