आजच्या काळात सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह केले पाहिजेत – ऍड.गोविद बादाडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । पुणे । फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला पदाधिकारी सत्यशोधिका सपना किसनराव माळी BE. Comp, आष्टा कासार उस्मानाबाद आणि सत्यशोधक विष्णू आनंदराव शिवणकर,BE. Mech, गिरगाव, हिंगोली यांचा दि.26 डिसेंबर 2021 रोजी दु.1 वाजता आष्टा हायस्कूल प्रांगणात  महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने  थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचे 131 व्या स्मृतींनानिमित व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंतीनिमित्ताने सत्यशोधक विवाह सोहळा यशस्वीरीत्या सम्पन्न झाला.
याप्रसंगी लातुर चे जेष्ठ समाजसेवक ऍड.गोविंद बादाडे म्हणाले की महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकात 150 वर्षा पूर्वी सांगितले की सत्यशोधक विवाह कोणताही स्त्री पुरुष लावू शकतो त्यासाठी मध्यस्थाची गरज नाही.आजच्या काळात सपना माळी चा आदर्श घेऊन  या पुढे सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह केले पाहिजेत असे म्हटले.पुढे बादाडे साहेब म्हणाले की सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी पुण्यावरून येऊन उस्मानाबाद मधील पहिला मोफत सत्यशोधक विवाह लावून इतराना प्रेरणा दिली त्याबद्दल  आभार व्यक्त करीत ढोक यांच्या फुले एज्युकेशन संस्थेला त्यांनी  प्रकाशीत केलेली महापुरुषांचे  पुस्तके घेऊन मदत करावी असे आव्हान केले.
या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी आवर्जून शुभसंदेशात म्हंटले की ही उंचचशिक्षित जोडी अंधश्रद्धा कर्मकांड जुगारून सत्यशोधक विवाह करीत आहे तो आदर्श समता सैनिकांनी घ्यावा.
हा  29 वा सत्यशोधक विवाह संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत सत्याचा अखंड गात वधु वर यांचे कडुन सर्वांचे साक्षीने जीवनसाथी म्हणून नीट संसार करीत महापुरुषांचे विचाराने समाजसेवा करू असे अभिवचन घेतले.
तर  महात्मा फुले रचित मंगळाष्टकाचे गायन प्रा.सुदाम धाडगे ,उद्धव पुंडे व भारतीय उद्देशिका रोहिदास तोडकर यांनी सर्वांकडून वधवून घेतली.
वधु वर यांनी सभामंडपात राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाङमय हातात धरून फुलांच्या पायघाड्या वरून आगमन करीत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी संस्थेचे वतीने नवदाम्पत्यांना ऍड.गोविद बादाडे व अध्यक्ष रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते रजिस्टर  नोंदणी करून सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व फुले दाम्पत्य फोटो फ्रेम भेट दिली.तर अक्षता म्हणून सुगंधी फुलांच्या पाकळ्या वापरून धान्याची नासाडी करू नये हा संदेश दिला.मोलाचे सहकार्य ओबीसी चे जेष्ठ नेते आनंदा कुदळे,दत्तात्रय धाडगे,नांदेड ,सि आय डी  ऑफिस चे विलास शिंदे यांनी केले तर सौ.मायादेवी  व स्वानंदी बनसोडे माय लेकींनी फुले दाम्पत्य पुर्ण फोटो रांगोळी  काडून या सोहळ्याला शोभा आणली.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे वधु वर यांचे आई वडील,मामा मामी व इतरानचे सत्यशोधक विवाहास मान्यता व मदत केले बद्दल सन्मानपत्र  व ग्रंथ मान्यवरांचे हस्ते देऊन सन्मानित केले.

Back to top button
Don`t copy text!