आज १६ एप्रिल – सॉक्रेटिसच्या तीन चाळण्या


सॉक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता. एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू म्हणाला, “तुमच्या मित्राबद्दल मी आताच जे काही ऐकले आहे ते तुम्हाला माहीत आहे का ?”

“भल्या माणसा, थोडा वेळ थांब, ” सॉक्रेटिसने त्याला थांबवले व म्हटले. “कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन चाळणीतून गाळून घेतो व नंतर ऐकतो …!!” ” तीन चाळणी ? काय, आहेत तरी काय त्या?”

“हे पहा, माझी पहिली चाळण आहे, माहितीची सत्यता…! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ?” “नाही, मी ऐकले आहे.” तो माणूस बोलला. “ठीक आहे” सॉक्रेटिस म्हणाला.

“आता दुसरी चाळण. मला असे सांगा की तुम्ही जे ऐकले ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे ?” “खरे तर ते चांगले नाही !” तो माणूस बोलला. म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे, मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला काही माहीत नाही ! बरोबर ?” सॉक्रेटिसने विचारले.

“ठीक आहे. आता आपण तिसरी चाळण लावूया. कदाचित त्यातून तुम्ही खरे उतराल”. “तिसरी चाळण आहे उपयुक्ततेचे…! तुम्ही जे मला सांगणार आहात ते माझ्यासाठी फायद्याचे आहे का ?” “खरे तर नाही !” तो माणूस बोलला. सॉक्रेटिस म्हणाला, “हे पहा, जी गोष्ट माझ्या फायद्याची नाही,

माझ्या मित्राबद्दल चांगले सांगत नाही, आणि जी खरी किंवा खोटी हे माहीत नाही, अशी गोष्ट ऐकून मी काय करणार…? म्हणून तुम्ही ही मला अजिबात सांगू नका.

…..आणि सॉक्रेटिसने आपले काम चालू केले…!!

कोणाबद्दल काहीही ऐकण्यापूर्वी ह्या तीन चाळण्या आवश्य वापरा…!! तुमचा बहुमोल वेळ वाचेल आणि मित्र, सहकारी, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याबद्दल गैरसमज होणार नाही व जीवन सुखी होईल !!

आपलाच गाळणधारक – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!