बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे संस्कार होय. आडात असेल तरच पोह-यात येणार. सत्यम् शिवम् सुंदरम् हेच खरे.
बुद्धी भष्ट होतच नाही. तिला सत्याकडे खेचण्यासाठी संस्काररुपी जीवनाक्रमण आवश्यक आहे. बुद्धी तेजस्वी ओजस्वी आणि सतशील हवी. बुद्धीला नैतिकतेची जोड हवी. बुद्धिमत्ता ही संपादन करावी लागते. त्यासाठी अथक व्यासंग, ध्येय निष्ठा, कार्यतपरता हवी.
भावना माणुसकीकडे खेचण्यासाठी निस्वार्थी वृत्ती हवी. भावनिक माणसे माणुसकीच्या नात्याने मदत करताना अडचणीत येतात. भावनेने माणसं जोडली जातात. अपेक्षा पूर्तीचा अभाव दिसताच माणसं दूर जातात. माणुसकी असावी पण भावनिक जवळीक पेक्षा कर्तव्य जाणिव हवी.
शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे संस्कारमय आचरण होय. श्रम शारीरिक, बौद्धिक असावे. श्रम करण्यात कमीपणा नसावा. कोणतेही काम करा. पण शरमेने मान खाली झुकेल असे काम नको. श्रमाने मानवाची उन्नती होते.नवनवीन कल्पना सूचतात.