
नूतनवर्षाभिनंदन…..
चैत्र शुद्ध प्रतिपदा, साडेतीन मुहूर्तातील पहिलाच चैतन्याचा मुहूर्त. चैताची सुरुवात भल्या पहाटे उठून अंभ्यगस्नानाने ब्रह्ममुहूर्तावर करावी. योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार झाल्यावर कळक्याच्या उंचपूरी काठीला स्वच्छ जलाने न्हाऊन, पांढऱ्या शुभ्र मोहोराच्या निंबाचा डाहाळा, आंबाच्या पानाचे तोरण, साखरगाठ, शालू, गडवा, झेंडूच्या फुलांचा रसरशीत हार याने युक्त गुढी उभारुन नव्या जगण्याला सुरुवात करावी.
गुढीपाडवा मंजे आपल्या जीवनात कर्तृत्वाची गुढी कळकासारखी सरळ उंच असावी. पण थोडशी झुकती. अहंपणा नसावा. जीवनात कडू – गोड अनुभव येणार. ते आपण एकत्रित करुन अनुभवावेत. अशी ही गुढी चैताच्या ऊन्हात तावून सुलाखून निघल्यास तिला कसलीच कसर लागणार नाही. चैताच ऊन मंजे किड न लागणे. याचा अर्थ जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेली अनुभवी माणसं वरश्याभरीच जगण्याच पंचांग सांगतात.
चैताच ऊन, शंभू महादेवाची कावडी यात्रा, धार, जत्रा, आष्टम्या, तमाशे, रामनवमी, हनुमान जयंती, लगीन घाई, नव्या घडामोडीचा शुभारंभ नुसती घाई धांदलीचा चैत महिना.
कैरीचं पन्हे, माठातंल पाणी, सावलीच झाड, ग्वाड ध्वाड, खारतुरं, पव्हणं, शिकणं यातच चैतन्य अनुभवता येतं.