आज २८ मार्च – आपण सारे एकाच माळेचे मणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नेहमी आपल्यापरीस दुसऱ्याची कृती आपणाला बरी वाटतेय. आपण किती भोगतोय अन् तो मात्र निंवात दिसतोय. हा निव्वळ भ्रम आहे. प्रत्येकाला काही ना काही समस्या असतेच. पण सोडविण्याची हातोटी, आनंदी वृत्ती याने तो मात करतो.

आता हेच बघा ना, नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा, व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी, घरी राहणाऱ्याला वाटतं काही तरी करावं पण घराबाहेर पडावं, एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहतो त्याचंच आईला कौतुक जास्त, वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही, गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा, शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे, देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं, परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो, केस सरळ असणारी म्हणते कुरळे केस किती छान, कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता एक मूल असतं त्याला वाटतं दोन असती तर, दोन असणाऱ्याला वाटतं एक वाला मजेत, मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता, मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते, ज्याला मूल नसतं तो म्हणतो काहीही चालेल.

नावे ठेवणारे रामातही दोष बघतात. कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात. नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही. मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे तरी मजेत आहे.

हात जोडून सांगतो, “जे आहे ते स्विकार करा आणि जीवन आनंदात जगा. उद्याच कुणी काय पाहिले ? जीवन पाण्याचा बुडबुडा कधी फुटेल कळण्याआधीच आनंदानं जगा.”

सुख भोगण्यात नसतं मानण्यात असतं

आपलाच मोदमयी – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!