निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही ‘चांगले’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘कठीण’ गोष्टीने होते. आणि नशीब जर काही ‘अप्रतिम’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘अशक्य’ गोष्टीने होते.
मला जमणारच नाही, रडत राव घोड्यावर, प्रचंड नकारात्मक, आळस, धरसोड वृत्ती यामुळे प्रगतीचा आलेख मंदावतो. प्रगती म्हणजे नुसता पैसा कमवणे एवढाचा सिमीत भावार्थ नव्हे. पैसा हवा पण तो रात्रीच्या समयी निद्रानाश करणारा नसावा. सकारात्मक वृत्तीने आपली व सहवासातील सर्वांना प्रेरणा मिळते. दुस-याची प्रगती आनंदाने स्विकारणे ही सकारात्मक उर्जा प्राप्त झाल्यास उभ्या आयुष्यात काहीच कमीच पडणार नाही.