105 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर 23 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
स्थैर्य, सातारा दि. 12 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 7, सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 9, खावली कोरोना केअर सेंटर 6, कोरोना केअर सेंटर वाई येथील येथील 2 असे एकूण 24 जणांचा दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्यांमध्ये पाटण तालुक्यातील नवसरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय व 25 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, तामिनी येथील 25 वर्षीय पुरुष, कालेवाडी येथील 21 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 30 वर्षीय पुरुष.
सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणाऱ्यांमध्ये कराड तालुक्यातील विंग येथील 19 युवक, 43 वर्षीय महिला, वानवाडी येथील 9 मुलगा, 19 वर्षीय युवक, 7 वर्षीय मुलगा व 70 वर्षीय महिला खटाव तालुक्यातील अंभेरी येथील 29 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय महिला, 5 वर्षाची मुलगी.
खावली कोराना केअर सेंटर मधील खटाव तालुक्यातील डांभेवाडी येथील 46 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील कुस ब्रुद्रुक येथील 19 वर्षीय युवक व 23 वर्षीय महिला, फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील 21 व 64 वर्षीय महिला, कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील 57 वर्षीय महिला.
वाई कोरोना केंअर सेंटर येथे दाखल असणारे 45 वर्षीय पुरुष व 15 वर्षाची मुली यांचा समावेश आहे.
105 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 29, पानमळेवाडी येथील 1, शिरवळ येथील 19, कराड येथील 6, वाई येथील 17, कोरेगाव येथील 2, मायणी येथील 13, दहिवडी येथील 5, महाबळेश्वर येथील 13 असे एकूण 105 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व एन.सी.सी.एस., पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या 23 जणांचे नमुने निगेटिव्ह आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.