वसंतोत्सवारंभ मंजे नव्या जगण्याच भान. पानगळ, चैतन्याची पालवी, उनाचा चटका, विविध रंगाची नैसर्गिक रंगपंचमी साजरी करणे. होळीत झालेल्या भस्माचे लेपन करणे मंजे धूलिवंदन होय. धूळीला नमन, धरती मातेला चरणस्पर्श होताच कळत नकळत नमन करणे, कृतज्ञता व्यक्त करणे हाच धूलिवंदनाचा मतितार्थ होय.
धूळवड मंजे अभक्षण व मद्यपान करुन धूळीत लोळणे नव्हे. तर पाय जमीनीवर ठेवणे, मस्ती डोक्यात शिरु न देणे, हव्यास कमी, इतरांना न लुबडाता ह्या त्यात समाधानी रहाणे. अहंकाराची होळीत राखरांगोळी करुन मी पणाची झूल बाजूला सारुन सत्वाची राख अंगीकारणे.
लै तालात वागू नकोस, तुझं सर्वस्व धूळीला मिळेल. धुंदी स्वभावाची, वृत्तीची, प्रवृत्तीची, मस्तीची, वागण्याची, अहंकाराची, सत्तेची, पैश्याची, प्रतिष्ठेची, गुर्मीची यातून माणसातला माणूस दिसत नाही. नात्यातला नात्यात रहात नाही. सर्व धुळीला मिळाल्यावर वेळ निघून गेलेली असते. धरणीला अंग व सगळ्यांनानी टाकून दिल्यावर धूळीचा अर्थ कळतो.
भिवाई धुळदेवाच चांगभंल मंजे भि वाईच नाहीत तर धुळीतच तुझं सर्वस्व.