“शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा” हा कानमंत्र अवघ्या बहुजन समाजाला देणारे, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदामंत्री, समतेच्या युगाचे प्रवर्तक, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, स्वातंत्र्य, समता, व बंधुता या जीवनमूल्यांचे प्रबळ समर्थक, प्रभावी वक्ता, जगन्मान्य विद्वान, समाजाभिमुख पत्रकार, ज्ञानाचे प्रतीक, स्त्रियांचे कैवारी, आधुनिक भारताचे जनक, भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु मानून त्यांचा विचार पुढे नेणारे, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ व समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक, बोधिसत्व, महामानव आणि करोडो लोकांना गुलामगिरीतून मुक्त करणारे मुक्तिदाता म्हणजेच डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर होय.
आत्मविश्वास हीच खरी गुरुकिल्ली, विद्या तरवारी सारखी असते, शील व चरित्र यांची जपणूक करावी, एक रुपया भाकरी व पुस्तकासाठी वापरावे, वाचन हेच ज्ञान, आपल्या समाज्याचा उद्धार आपणाच करावा, शिक्षण हेच साऱ्याचे मूळ आहे. अश्या विचारांतून बौद्ध धर्माची दीक्षा घेणारे आंबेडकर, त्यांचे विचार, चरित्र, चारित्र्य, ग्रंथ संपदा, पुस्तक संग्रह यांचे भान नव्या पिढीला ज्ञात करावे.