सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात देवराष्ट्रे नावाच्या छोट्याशा गावी १२ मार्च १९१३ रोजी यशवंतराव चव्हाण यांचा जन्म झाला. वडील बळवंतराव व आई विठाई यांचे संस्कार मुशीतून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार उदयास आले.
नका बाळांनो डगमगू, चंद्रसूर्यावरील जाईल ढगू अशी शिकवण देणारी विठाई माता त्यांना लाभली.
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, युगप्रवर्तक, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, भाग्यविधाते, सह्याद्रीचे सुपुत्र, महाराष्ट्राची अस्मिता, साहित्यिक, रसिक, वाचक, सह्दयी राजकारणी, जनसामान्याचे माणसातील देव, कलावंताचे दैवत, शब्दांचे सामर्थ्य लाभलेले हे राजकीय व्यक्तीमत्व असूनही चारित्र्य व चरित्र संपन्न आहे.
आजच्या पिढीला त्यांचे कृष्णाकाठ व त्रृणानुबंध या साहित्य कृतीची पारायणे होणे काळाची गरज आहे. सौ. वेणूताईंची सावली सारखी खंबीर साथ लाभली. जीवनात विरगुंळा या निवासीवास्तू शिवाय संपत्तीचा लवलेश सापडत नाही. ह्याच सध्याच्या राजकीय नेत्यांनी आदर्श घ्यावा.
कराड येथील कृष्णा – कोयनेच्या प्रीतिसंगमावर जाऊन नतमस्तक झाल्यावर आपणाला चैतन्यमय प्रेरणां निश्चित मिळणार.