
गरीब अन् श्रीमंत ही दरी अलिकडे वाढतच चालली आहे. गरीब जमिनीवर बसला तर त्याची परीस्थिती आणि श्रीमंत बसला तर मोठेपणा ? या दुनियेत राजाचा रंक अन् रंकाचा राजा केव्हाही होऊ शकतो. आजचा भिकारी उद्या करोडपती होताना आपण पाहिले आहे. आपल्या मनातून ही गरीब श्रीमंत भिंत निघाली पाहिजे.
गरीबाच्या दारात गेल्यास आदरातिथ्य मनापासून केलं जातेय. तोंडभरुन कौतुक, पोटभरुन जेवण, आनंदाने व मनापासून सर्व काही सुरु असते. या उलट श्वानापासून स्वागत, बेल वाजून नोकरांकडून चौकशी, कामापुरते जुजबी बोलणं, चहापाणी विचारुन ही सारी श्रीमंतपणाची प्राथमिक लक्षणे अनुभवता येतात.
परिस्थितीने मोठे होता आले नाही तरी चालले. पण मनाची श्रीमंती असावी. रस्त्याने चालताना दोनचार जणांशी स्वतः हून बोलावे. अडीनडीला धावावे. तोरणा, मरणादारी सहभागी असावे. ऊणीधुणी, तुझं माझं, अडला नडला, मानापमान, परिस्थिती, गरजेनुसार बद्दल न करता स्थिर स्थितीत राहणे हेच जगणं आहे.
हीच मानसिकता माणुसकीला मागे खेचत आहे. माणूस हा फक्त माणूस असतो. तो कधीच गरीब आणि श्रीमंत नसतो. चार माणसं जोडणे, त्यांच्या सहवासात गेल्यावर आपल्यामुळे आनंद निर्माण होत असल्यास पैक्यांच्या श्रीमंती परीस समाज्याने दिलेला मोठेपणा खरा श्रीमंत.
आज सोमवती अमावस्या घरातूनचं येळकोट येळकोट जय मल्हार करुन पाच पावली सोन्याची जेजुरी. खोबरं भंडार, कोटमा पूजन, दिवटी प्रज्वलन अन् तळीला चांगभलं. खंडेराया नववरीस कोरोनामुक्त जाऊ दे. आजच्या घडी गरीब श्रीमंत एकाच रांगेत.