आज १० एप्रिल – श्रीराम नव “मी”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

२०२२ मधील १० तारखेची राम नवमी जणू सध्याच्या कोविड परिस्थिती “मी” पणाचा त्याग करायलाच शिकवते. बघा ना खोलवर जाऊन पाहिले तर सारं मायेचं मडकं ते पण फुटकं. माझं सारं, मी केलं, पठ्याचा हात कुणी धरायचा नाही, आपला नादच खुळा, नडला तो फाडला आश्या आरोळ्या ठोकणाऱ्या बहाद्दरांच काय होतंय हे आपण सध्या पाहतो अन् अनुभवतो.

श्रीराम नवमी आपणाला आपल्यातील मी काढून आम्ही चा स्विकार करायला शिकवते. मी कोण ? कसी झाड की पत्ती अशीच अवस्था होऊन बसलीय.

श्रीराम चरित्र हेच शिकवते की आपण निमित्त आहे. बाकी सारं शून्य आहे. राजा दशरथाची आज्ञापालन, कौसल्या मातेचा आशीर्वाद, कैकय मातेचा वर, शबरीचा पाहुणचार, मारुतीरायाचे उपकार, जटायूचे सहकार्य, सावली सारखा पाठीराखा बंधू लक्ष्मण, पतिव्रता सीतामाई, भरतासाठी गादी त्याग, रावणाला मुक्ती, बिभीषणाला राजपद, आयोध्या अगमन, जनास्तव पत्नी वियोग, लवाकुंशा बरोबर युद्ध, लक्ष्मणाने देहत्याग आपण ही लगेच देहत्याग. यावरुन आपल्या लक्ष्यात आले असेल की रामच जीवनच मुळी समर्पण, त्याग यासाठीच होत.

चैत्र शुध्द नवमीला दुपारी मध्यावर सूर्यबिंब असताना या एक वचनी, एक बाणी, एक तत्वी, एक पत्नी लोकोत्तर राजाचा जन्मच हे सांगतो. तू तुझ्यासाठी नोहे. दुस-याला मदत करणे व झिजणे हेच रामा तुझं जगाणं.

श्रीराम नवमी निमित्तानं आपण सुद्धा आपल्यात मी काढून टाकणे. सर्वांनाचे होणे. कुठंच न जादा रमता सतत नव नव्या कल्पनेत रमणे व गमण करणं. एका जागेवर न बसता सतत प्रवाही होण्यातच रामत्सव आहे. शेवटी आपल्यातच रामरावण दडला आहे. समोरिल दृश्य दिसताच स्थिरता प्राप्त जय श्रीराम, जरा चलबिचल झाली तर रावण. शेवटी रामनाम सत्य आहे. हेच खरं. आपण सुद्धा मी पणाचा त्याग करुन विश्वव्यापक दृष्टिकोनातून राम उत्सव घरीच साधेपणाने करु.

सध्या संचारबंदी शिथिल असल्याने पाल्यांना श्रीरामस्तोत्र पठण करण्यास लावावे. हे संस्कृत भाषेत असल्याने एकाग्रता, उच्चार, जीव्हा वळण, बैठक, संयमपणा वाढीस लागतो. रामायण ग्रंथ हे भारतीय कुटुंब व्यवस्थेचा भक्कम पाया आहे. त्याचे वाचन करावे. मुख शुध्दीसाठी सुंठवडा करुन प्रसादरुपी सेवन करावे. खारकी सारखे बारीक असावे. खोबऱ्यासारखे चविष्ट, सुंठेसारखे स्वादिष्ट व प्रमाणात साखरेसारखे गोडवा रुपी आयुर्वेदीक सुंठवडा घ्यावा व द्यावा. महर्षी वाल्मीक यांचे स्मरण हेच श्रीराम चिंतन. रामनामा सोबत रामाचं काम करावे. मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श मुलगा, बंधू, पती, मित्र यासह सर्वच नातेसंबंधावर कृपाछत्र श्रीराम अलौकिकच.

आयोध्यानगरीत भव्य दिव्य रामनगरी बरोबरच मायबाप सरकारने ज्ञानमंदिरे उभारावीत. रामाच्या वेळी गुरुकुल, आमच्यावेळी कुलगुरु अन् आता तर घरकुलच शिक्षण हे राम.

आपलाच रामसेवक – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!