
दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । फलटण । जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी संचलित श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणकडे दि. १ ते १५ डिसेंबर अखेर गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट व तोडणी वाहतूक कंत्राटदार यांची बीले संबंधीत ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचे बँक खात्यावर दि. २९ डिसेंबर रोजी जमा करण्यात आली आहेत. त्यापूर्वी दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट यापूर्वीच संबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.
दि. १ ते १५ डिसेंबर अखेर ४५ हजार २२७.४२० मे. टन ऊसाचे गाळप झाले असून एफ. आर. पी. प्रति टन २७६१ रुपये प्रमाणे १२ कोटी ४८ लाख ७२ हजार ९०८ रुपये आज दि. २९ डिसेंबर रोजी बँकेत वर्ग करण्यात आले आहेत.
दि. १ ते १५ डिसेंबर अखेर २ कोटी ३१ लाख ८२ हजार ८५१ रुपये संबंधीत तोडणी वाहतूक दारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
श्रीरामकडे दि. १५ डिसेंबर अखेर ८५ हजार ६७५ मे. टन ऊसाचे गाळप झाले असून एफ. आर. पी. २७६१ रुपये प्रती टन प्रमाणे २३ कोटी ६५ लाख ४८ हजार ६७५ रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
यावर्षी गळीत हंगाम दि. १२ नोव्हेंबर रोजी सुरु झाला असून ४७ दिवसात १ लाख २९ हजार ८१५ मे. टन ऊस गाळप झाले असून १ लाख ४० हजार ५५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.०१ % आहे.