दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२१ | फलटण | फलटण शहरातील भुयारी गटार कामाच्या संदर्भात सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याची माहिती नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.
फलटण शहरांमध्ये होत असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्या बाबतचे शासकीय अहवाल सुद्धा उच्च न्यायालयात दाखल केलेले आहेत. त्याबाबतची दाखल असलेली जनहित याचिका उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. तरी उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या याचिकेवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारी अर्ज निकाली काढलेला आहे. याबाबत आपण उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याची माहिती नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.
भुयारी गटार योजनेच्या बाबत दाखल असलेल्या जनहित याचिका सोबतच जिल्हाधिकारी यांनी कोणतेही समन्स किंवा कोणतीही सुनावणी न घेता एकतर्फी निकाल दिल्याने जिल्हाधिकारी यांच्या विरोधात सुद्धा उच्च न्यायालयांमध्ये दाद मागणार आहे, असेही अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.