दिवाळी आनंदाने परिवारासहित सुरु आहे. तवा कापरं भरलेले शरीर, पाठीची कमान , थरथरणाऱ्या हातांना अनुभवाचा आधार असतो. त्यांना आपल्या आधाराची गरज असते. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते . विश्वास संपला तर संबंध संपतात .प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो. तो म्हणजे आपण जेवढ्या वाईट दिवसांचा सामना करातो . त्यापरीस दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील. संयम म्हणजे वाट पाहत बसणे नव्हे, तर योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहणे.
“वाद” फक्त “माझंच योग्य” आहे हे सांगण्यासाठी असतो.”संवाद” काय योग्य आहे ? हे शोधण्यासाठी असतो. “सुसंवाद” जगण्यासाठी आवश्यक आहे. वादविवाद ज्येष्ठांशी न घालता समजूतदार पणाचे आपण पाईक होऊन पुढं जाऊ या.
अनुभवाची झाडं जपली पाहिजेत. अनेक चढउताराचे उन्हाळे पावसाळे अनुभवले आहेत. त्याच्या थरथरत्या हाताला आपला आश्वासक हात हातात घालून फिरावे. चालताना वाळल्या पाचोळ्यावर पाय देताना आपण सबुरीने घ्यावं. चुरगळताना, तुडवताना आपण जमले तेवढे जपावे. अन्यथा आपणाला वेळ गेल्यावर जाग येऊन उपयोग नाही. आपण योग्य काळजी घेतली नाही तर आपल्यालाच कापरं भरेल. मग सावरायच कुणी कुणाला?
थरथराट असावा पण थरथरणे सावरावे
आपलाच सावरे – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१