विकासकामे व मूलभूत सुविधांसाठी निधी देणार – वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई


दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । मुंबई । कोविड संसर्गामुळे राज्यावर आर्थिक बोजा असला तरी विकासकामांसाठी तसेच जनतेच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल, असे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषदेत पुरवणी मागण्यांवर उत्तर देताना वित्त राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, पुरवणी मागण्यांवर सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा राज्य शासन विचार करेल. कोकणातील नगरपंचायतींना निधी उपलब्धतेसंदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल. तसेच नागरी सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र, कोविडमुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तरीही जनतेला सुविधा देण्यासाठी आलेल्या सूचनांचा राज्य शासन सकारात्मक विचार करेल.

यावेळी पुरवणी मागण्यांवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानपरिषद सदस्य सुरेश धस यांनी मते मांडली.


Back to top button
Don`t copy text!