शेतकऱ्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची भूमिका महत्वाची

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, त्यांचे समाजातील स्थान अधिक उंचावण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत कृषी व सहकार क्षेत्राच्या माध्यमातून घेतलेली भूमिका आणि त्यातून शेती व शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी दि. ३ ऑगस्ट रोजी त्यांची जयंती राज्यभर शेतकरी दिन म्हणून साजरी करण्यात येत असल्याचे मंडल कृषी अधिकारी अमोल सपकाळ यांनी सांगितले.

सांगवी, ता. फलटण येथे सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त कृषी खात्याच्या माध्यमातून आयोजित शेतकरी दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मंडल कृषी अधिकारी अमोल सपकाळ बोलत होते, अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शर्मिलाताई सुरेश जगताप होत्या, विशेष अतिथी म्हणून श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटराव जाधव, लायन्स क्लब फलटणचे उपाध्यक्ष डॉ. तुषार गायकवाड, कृषी महाविद्यालय, पुणेचे संजय गायकवाड, कृषी महाविद्यालय, मुळदे येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव योजनेंतर्गत येथे वास्तव्यास असलेले विद्यार्थी/विद्यार्थिनी, प्रगतशील शेतकरी दत्तात्रय घोरपडे, संजय वीरकर, रामचंद्र मोरे, दिलीप सस्ते यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार व कृषी क्षेत्राच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक स्थान उंचावताना त्याला उच्च शिक्षणाची जोड आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन शिक्षणाच्या सुविधा शेतकऱ्यांच्या मुलांना सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा यावेळी अमोल सपकाळ यांनी घेतला.

प्रारंभी कृषी सहाय्यक योगेश भोंगळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी विवेचन केले, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र पालवे यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

प्रगतशील शेतकरी पोपटराव गायकवाड गुरुजी यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन, शेवटी समारोप व आभार प्रदर्शन केले.

स्थैर्य, फलटण : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केल्यानंतर प्रतिमेसमवेत उपस्थित मान्यवर व शेतकरी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!