तिरूमलाच्या वतीने ग्राहकांसाठी विशेष योजना जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२१ । फलटण । येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर तिरूमला एडीबल ऑईल, तिरूमला कोकोनट ऑईल आणि कुटे ग्रुप डेअरीच्या गुडमॉर्निंग घी च्या उत्पादनावर ग्राहकांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कुटे ग्रुपच्या मॅनिजिंग डायरेक्टर अर्चना सुरेश कुटे यांनी केले आहे.

आजपर्यंत ग्राहकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे कुटे ग्रुपने यशाचे अनेक शिखरे पार केली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता यातून सावरण्याचा प्रयत्न होत असून कुटे ग्रुपच्या तिरूमला ऑईलच्या वतीने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी येणाऱ्या दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. तिरूमला एडीबल ऑईलच्या पाच लिटरच्या जार (कॅन्ड) वर तिरूमला कोकोनट ऑईलची २० मि.ली. ची बॉटल अगदी मोफत देण्यात येणार आहे.तर तिरूमला कोकोनट ऑईलच्या २५० मि.ली.वर तिरूमला कोकोनटची ५० मि.ली.ची बॉटल अगदी मोफत देण्यात येणार आहे. कुटे ग्रुपच्या गुडमॉर्निंग शुध्द तुपावर तिरूमला कोकोनट ऑईलची २० मि.ली.ची बॉटल मोफत देण्यात येणार आहे. या सर्व योजना मर्यादीत कालावधीसाठी असल्याने ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्ट अर्चनाताई सुरेश कुटे यांनी केले आहे.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!