जिल्ह्यातील उपहारगृहे, भोजनगृहे व इतर सर्व आस्थापनांच्या वेळेत सुधारणा


दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२१ | सातारा | मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दि. 19 ऑक्टोबर रोजीच्या आदेशान्वये उपहारगृहे व भोजनगृहे  तसेच इतर आस्थापना संबंधी बाबींमध्ये सुधारणा केलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी दि. 13 ऑगस्ट 2021 रोजीच्या आदेशात सुधारणा करुन “ सातारा जिल्ह्यातील सर्व उपहारगृहे व भोजनगृहे सर्व दिवस रात्री 12.00 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील इतर सर्व आस्थापना यांना सर्व दिवस रात्री 11.00 पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आहे”.


Back to top button
Don`t copy text!